उगाच नाही तू मला इतकी भावली
तुझ्या इतकीच सुंदर दिसते तुझी सावली
डोळ्यात तुझ्या दिसे मज नक्षत्र तारे
वाटे त्यातच दडले माझे भविष्य सारे
भिडते जेव्हा तुझी नजर, पडते वीज
जळून जाते माझे धडधडते काळिज
पडे कानावर जेव्हा तुझी वाणी
बेसूर वाटतात मज मधुर गाणी
सोडता मोकळे तू हे घनदाट केस
दिवस घेऊन येतो वेड्या रात्रीचे वेश
तुझे असे ते लाज ओले हसने
जसे फुलाचे दवाने भिजणे
पडता वाळूवर तुझे पाऊलठसे
समुद्री लाटा होती वेडेपिसे
तुझ्या गालावर बसलेला रुसवा
भासवतेस खरा पण असतो फसवा
गुलाबाला होता फक्त काट्यांच्या संग
त्यास लाभला तुझ्या ओठांचा रंग
येतात जेव्हा तुझ्या डोळ्यातून अश्रू
माझे दुःख त्यात लागते विरघळू
तुझे ह्रदय आहे इतके कोमल
ते माझे नाही ही एकच सल
कधी देशील ग मला तुझे हे मन
खरंच होत नाही आता सहन