Saturday, June 9, 2012

तू आणि मी...I, Love and You !


My Scribbles





पहिल्यांदा समोर आलेली तू 
तुला पाहून पाहत राहणारा मी
गरदीतून नाहिशी होणारी तू 
आणि गर्दीत तुला शोधत बसणारा मी
Stop वर येउन बसची वाट बघणारी तू 
कित्येक बस सोडून तुझी वाट बघणारा मी
Lecture ला नेहमी हजेरी लावणारी तू 
आणि नेहमी दुसऱ्यानची proxy लावणारा मी
माझ्याशी कधी ही न बोलणारी तू 
फक्त तुझ्याशीच बोलावे असे वाटणारा मी
मैत्रिणींन सोबत सतत हसणारी तू 
मित्रान सोबत असून नसणारा मी
माझ्या नकळत मला पाहणारी तू 
तुझी ही चोरी नेहमी पकडणारा मी
माझ्या समोर आल्यावर बावरलेली तू 
आणि स्वतःच स्वतःला सावरणारा मी
डोळ्यातून मनातलं सांगणारी तू 
मनातलं कधी ही ओठांवर न आणणारा मी
माझ्या प्रश्नाची वाट बघणारी तू 
तुझ्या उत्तराला घाबरणारा मी
कधी एक दिवस न येणारी तू 
आणि दिवसभर हरवून जाणारा मी
मग अचानक एका नवीन वाटेवर वळणारी तू 
आणि जुन्या वाटेवर तुझी वाट पाहणारा मी
अश्या वेड्या प्रेमातून उभरणारी तू 
 आणि खरंच प्रेमात पडणारा मी....


by Bharat Bhankal









मेरी रट ! I Iterate...

ये जो तेरी आँखें इतनी नटखट है ना जाने इनमें कैसा कपट है जिसमें उलझा हूँ वो तेरी उलझी हुई लट है सोने ना दे ये तेरे ख...