Lyrics/
SANDEEP KHARE
Singer
SALIL KULKARNI and SANDEEP KHARE
Music
SALIL KULKARNI
Album
SAANG SAKHYAA RE
लागते अनाम ओढ श्वासाना लागते अनाम ओढ श्वासाना येत असे उगाच कंप ओठांना होई का असे तुलाच स्मरताना..... हसायचीस तुझ्या वस्त्रांसारखीच फिकी फिकी, माझा रंग होऊन जायचा उगाच गहिरा.. शहाण्यासारखे चालले होते तुझे सारे, वेड्यासारखे बोलू जायचा माझा चेहरा! एकांती वाजतात पैजणे भासांची हालतात कंकणे कासावीस आसपास बघताना..... संवादांचे लावत लावत हजार अर्थ, घातला होता माझ्यापाशी मीच वाद.. नको म्हणून गेलीस, तीही किती अलगद, जशी काही कवितेला जावी दाद! मी असा जरी निजेस पारखा रात्रीला टाळतोच सारखा स्वप्न जागती उगाच निजताना..... सहजतेच्या धूसर तलम पडद्यामागे जपले नाहीस नाते इतके जपलेस मौन... शब्दच नव्हे, मौनही असते हजार अर्थी, आयुष्याच्या वेड्या वेळी कळणार कोठून? आज काल माझाही नसतो मी सर्वातुन एकटाच असतो मी एकटेच दूर दूर फ़िरताना..... | |||||||
No comments:
Post a Comment
Feel Free to Comment