LYRICS
पाऊस असा रुणझूणता
पैंजणे सखीची स्मरली
पाऊल भिजत जाताना
चाहूल विरत गेलेली ...
ओले त्याने दरवळले अस्वस्थ फुलांचे घोस
ओलांडून आला गंध , निस्तब्ध मनाची वेस
पाऊस असा रुणझूणता
[ पाउस सोहला झाला , पाउस सोहला झाला कोसळत्या आठवणीचा
कधी उधाणता अन केव्हा संथ थेम्बंच्या संथ लयीचा
चाहूल विरत गेलेली ... ]
पाऊस असा रुणझूणता
पैंजणे सखीची स्मरली
पाऊल भिजत जाताना
..
नभ नको नको म्हणताना
पाउस कशाने आला
गात्रातून स्वच्छंदी अन
अंतरात घुसमटलेला..
पाऊस असा रुणझूणता
पैंजणे सखीची स्मरली
पाऊस भिजत जाताना
चाहूल विरत गेलेली..
No comments:
Post a Comment
Feel Free to Comment