Saturday, August 18, 2012

आई आणि बालपण...Mother and Childhood





पायांच्या पाळण्यावर दिलेली झूल
आठवते खूप !
निजताना तुझ्या कुशीची उब
आठवते खूप !
पदराने तू  माझं पुसलेलं मुख
आठवते खूप !
जाताना दूर लागलेली रुखरुख
आठवते खूप !
ओल्या जखमेवर तू मारलेली फुंक
आठवते खूप !
मनातून प्रेम पण रागाचं रूप
आठवते खूप !
रागावून तुझ्यावर न जेवण्याची चूक
आठवते खूप !
मग तुझ्याच हाताने भागलेली भूक
आठवते खूप !
वाढवलास अंगी जगण्याचा हुरुप
आठवते खूप !
दुखातही नेहमी दिलेले सुख
आठवते खूप !


- Bharat Bhankal



No comments:

Post a Comment

Feel Free to Comment

मेरी रट ! I Iterate...

ये जो तेरी आँखें इतनी नटखट है ना जाने इनमें कैसा कपट है जिसमें उलझा हूँ वो तेरी उलझी हुई लट है सोने ना दे ये तेरे ख...