येत्या पावसात मी तुझ्या सोबत नसेन.
यंदा दुरूनच त्याला,
फक्त बघेन.
गाठले त्याने रस्त्यात मला जरी
सांगेन त्याला,
आतां माझ्या सोबत,
नाही रे ती !
वाटले होते बघेन तुला,
पावसात भिजताना.
लख लख त्या हिऱ्यांनी,
तुला सजताना.
पावसाचा एक एक थेंब,
यंदा जाईल फुका.
त्याने चिंब भिजवले तरी,
असेन आतून सुका.
का घेउन येतो पाऊस
हा मुजोर वारा,
का आता फक्त तुझ्या
आठवणींचा सहारा
अश्या पावसांत तुझ्या आठवणीने
येतात अंगावर शहारे.
चेहर्यावर ओघळणारे पावसाचे थेंब
लागतात खारे.
येत्या पावसात मी तुझ्या सोबत नसेन
यंदा दुरूनच त्याला,
फक्त बघेन.
By:
No comments:
Post a Comment
Feel Free to Comment