Wednesday, January 5, 2011

तुझ्या खेरीज...Without You...

तुझ्या खेरीज - Without You...

तू दिलेलं हृदय अजुन आहे माझ्याकडे, तुझ्या खेरीज.
घेउन गेलीस सगळं हे कस बर विसरलीस.
ठाऊक आहे घेउन जाशील ते ही, पण आहे गळ एवढीच
देऊन जा माझे हृदय जे  अजुन ही, धडधडतय  तुझ्या छातीत.
तू दिलेलं हृदय अजुन आहे माझ्याकडे, तुझ्या खेरीज.

तू दिलेलं घड्याळ अजुन आहे माझ्याकडे, तुझ्या खेरीज
तू  सोडवी माझी, तशी वेळेची साथ त्याने सोडली आहे कधीच.
तरी हिंडतो घालून हातात उगीच.
हे मनगटी माझ्या जैसे, तू  धरुनी माझा हात नेहमीच.
तू दिलेलं घड्याळ अजुन आहे माझ्याकडे, तुझ्या खेरीज

तू दिलेलं एक एक गुलाब अजुन आहे माझ्याकडे, तुझ्या खेरीज.
एका गणिताच्या पुस्तकात जपून ठेवली होती सगळीच.
पुस्तकातील  आकडे सुद्धा सोडवू लागले होते आपल्या प्रेमाचे गणित.
पण तू केलस मला वजा, जेव्हा करायची होती बेरीज.
तू दिलेलं एक एक गुलाब अजुन आहे माझ्याकडे, तुझ्या खेरीज.

तू  दिलेला तो फोटो अजुन आहे माझ्याकडे, तुझ्या खेरीज.
फाडताना तो मधून कसे ग रुतले नाही तुझे काळीज.
अश्या आठवणी मिटवून कुणी विसरत नसते कुणाला मुळीच.
माझ्या हातात तुझा तो हात राहिला आहे त्या जागीच
तू  दिलेला तो फोटो अजुन आहे माझ्याकडे, तुझ्या खेरीज.

तू दिलेलं ताजमहाल अजुन आहे माझ्याकडे, तुझ्या खेरीज.
मुमताज गेली, शाहजहान गेला, तू ही गेलीस, उरलो आता मीच.
नात्याचा आपल्या ह्या, कधी झाले नाही चीज
तुझ्या माझ्या प्रेमाची आता, आठवण हीच.
तू दिलेलं ताजमहाल अजुन आहे माझ्याकडे, तुझ्या खेरीज.
                                                                                          
No comments:

Post a Comment

Feel Free to Comment

मेरी रट ! I Iterate...

ये जो तेरी आँखें इतनी नटखट है ना जाने इनमें कैसा कपट है जिसमें उलझा हूँ वो तेरी उलझी हुई लट है सोने ना दे ये तेरे ख...